www.balaee.com                                                                                                                          www.balaee.com 

नमस्कार मंडळी...

महाराष्ट्राच्या महासाईटवर आपले सहर्ष स्वागत!

आम्ही सीडी स्वरुपातील "ज्ञानगंगा" या मराठीतील पहिल्या व एकमेव विश्वकोशाचे निर्मितीकार. . ‘ज्ञानगंगा’ या मराठी विश्वकोशाला आपण प्रंचड प्रतिसाद दिला. आज ३०००० पेक्षा जास्त मराठी कुटूंबांनी आणि असंख्य मराठी जणांनी आम्हाला त्यांच्या मनात स्थान दिले त्याबाबत आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो.  पण नविन विषय व ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचविणे सीडीच्या माध्यमातुन कठीण जात होते. म्हणुन आम्ही संपूर्ण विश्वकोश आपल्यासाठी अगदी मोफत www.balaee.com च्या माध्यमातून उपलब्ध केला आहे.

आम्ही या साईटचे नाव ’बलई’ असे ठेवले आहे. ’बलई’ हा कोकणी भाषेतील अतिशय प्रचलित शब्द. जी गोष्ट, वस्तू वा घटना बोलतांना आपल्याला शब्दात व्यक्त करता येत नाही अशा गोष्टी, वस्तू वा घटना व्यक्त करण्यासाठी या शब्दाचा वापर कोकणी भाषेत मोठ्या प्रमाणात केला जातो. थोडक्यात रंग बदलणा-या सरड्यासारखा हा शब्द आपले अर्थ बदलतो. तसेच www.balaee.com परिस्थितीनुसार आपले रंगरूप बदलत राहील व आपल्या सर्वांच्या जिवनातील विविध रंग उधळत राहील.

सध्या ह्या साईटच्या माध्यमातून आम्ही मराठी विश्वकोश, मराठी प्रश्नकोश व शब्दकोश सादर करीत आहोत. ह्या तीन विभागांमधुन साधरणत: २०००० पेक्षा जास्त पानांची माहिती आम्ही देत आहोत. पण आम्ही ऎवढ्यावरच थांबणार नाही आहोत. कारण आम्ही या साईटला ‘महाराष्ट्राची महासाईट’ बनविण्याचा निश्चय केला आहे. त्या अनुषंगाने अजुन अनेक विषय यात समाविष्ट होणार आहेत. ही केवळ सुरुवात आहे.

पण मंडळी ही साईट महासाईट होण्यासाठी आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. आणि ती आपण योग्य रीतीने पार पाडाल याची आम्हाला खात्री आहे. आपण सर्वांना आम्ही या माध्यमातून आव्हान करतो की ही साईट अधिक सुंदर, अचूक व परिपुर्ण होण्यासाठी आपले मौलिक विचार customersupport@balaee.com वर पाठवा. व सतत साईटला भेट देत रहा.

धन्यवाद.